S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बाळासाहेबांची प्रकृती ठीक आहे -गोपीनाथ मुंडे
  • बाळासाहेबांची प्रकृती ठीक आहे -गोपीनाथ मुंडे

    Published On: Nov 15, 2012 07:18 AM IST | Updated On: Nov 15, 2012 07:18 AM IST

    15 नोव्हेंबरभाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनीही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस केली. कालच्या पेक्षा आज बाळासाहेबांची प्रकृती ठीक आहे. ते उपचाराला प्रतिसाद देत आहे अशी माहिती मुंडे यांनी दिली. तर बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे स्वत: येऊन माहिती देतील असं शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी सांगितलंय. दरम्यान आज सकाळपासून मातोश्रीवर पुन्हा गर्दी वाढू लागलीय. मातोश्रीबाहेरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. पोलिसांबरोबरच रॅपिड ऍक्शन फोर्सचे जवानही तैनात करण्यात आलेत. राज ठाकरे आणि ज्येष्ठ शिवसेना नेते रात्रभर मातोश्रीवर होते. आज सकाळी मनोहर जोशी, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, अभिनेता नाना पाटेकर यांनी सकाळी मातोश्रीवर भेट दिली. तर रात्री अमिताभ आणि अभिषेक बच्चन, संजय दत्त मातोश्रीवर येऊन गेले. रात्री अडीचच्या सुमाराला उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर येऊन बाळासाहेबांवर उपचार सुरू असल्याचं सांगितलं. आणि शांतता आणि संयम राखण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं. 'मातोश्री'वरून थेट लाईव्ह कव्हरेज पाहा - आयबीएन लोकमत आणि आयबीएन 7 वर

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close