S M L
  • सलमान खान 'मातोश्री'वर

    Published On: Nov 15, 2012 04:12 PM IST | Updated On: Nov 15, 2012 04:12 PM IST

    15 नोव्हेंबरबाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मातोश्रीवर दाखल झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई, अभिनेता सलमान खान, नाना पाटेकर, दिग्दर्शक मधुर भांडारकर मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपुस केली. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. बाळासाहेबांनी रात्री उशिरा उपचारांना प्रतिसाद दिल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे स्वत: येऊन माहिती देतील असं शिवसेनेच्या आमदार नीलम गोर्‍हे यांनी सांगितलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close