S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राजू शेट्टींची तुरुंगातून सुटका ;आंदोलन सुरूच राहणार
  • राजू शेट्टींची तुरुंगातून सुटका ;आंदोलन सुरूच राहणार

    Published On: Nov 16, 2012 05:09 PM IST | Updated On: Nov 16, 2012 05:09 PM IST

    16 नोव्हेंबरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची येरवडा तुरुंगातून संध्याकाळी साडे सात वाजता सुटका झाली. बारामतीच्या सेशन्स कोर्टाने त्यांना जामीन दिलाय. पण त्यांना इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यात यायला बंदी घालण्यात आली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर राजू शेट्टींनी ऊसदरासाठीची चळवळ मागे हटणार नाही शेवटपर्यंत लढत राहणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आमचा लढा राज्यकर्त्यांशी आहे. जबरदस्तीनं कारखानं सुरू करणं मान्य करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच शरद पवार आणि अजित पवार यांच्या दबावामुळे राज्य सरकार शेतकर्‍यांवर दडपाशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close