S M L
  • बाळासाहेबांचा जीवन प्रवास

    Published On: Nov 17, 2012 11:44 AM IST | Updated On: Nov 17, 2012 11:44 AM IST

    शिवसेनाप्रमुख.. हिंदुहृदयसम्राट.. जाज्वल्य नेता.. महाराष्ट्रातला आजवरचा सगळ्यांत लोकप्रिय आणि सगळ्यांत वादग्रस्त व्यक्तिमत्त्व..याच करिष्माई व्यक्तिमत्त्वाच्या बळावर त्यांनी शिवसेनेचा झेंडा महाराष्ट्रा फडकावला. पण या राजकीय वादळाची सुरुवात अर्ध्या शकतापूर्वी कुंचल्याच्या फटकार्‍यांनी झाली. न्यूयॉर्क टाइम्ससारख्या सुप्रसिद्ध पेपरातली नोकरी सोडून त्यांनी मार्मिक नावाचं झंझावाती मासिक सुरू केलं. 1960चा तो काळ होता. महाराष्ट्र राज्याची मुंबईसह स्थापना झाली होती खरी.पण मराठी माणसामध्ये खदखद होती. तिला वाच फोडली ती मार्मिकने. व्यंगचित्र वाचून अस्वस्थ झालेल्या तरुणांना पुढे गरज होती ती व्यासपीठाची. मुंबई महाराष्ट्राला मिळाली असली, तरी नोकर्‍यांमध्ये वर्चस्व मात्र दाक्षिणात्यांचं होतं. 'बजाव पुंगी भगाव लुंगी' म्हणत 19 जून 1966 च्या दिवशी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळ केशव ठाकरे.शिवसैनिकांचे बाळासाहेब बनले. रस्त्यावर राडा करण्यापासून ते स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून विधायक कामं करणार्‍या हजारो शिवसैनिकांची पाहता पाहता फौजच उभी राहिली. दोनच वर्षांत ठाणे महापालिकेवर सेनेचा भगवा फडकला. मुंबईमध्ये.. राजकारणात काँग्रेसला आणि कामगार संघटनांमध्ये कम्युनिस्ट संघटनांना शिवसेनेने सुरुंग लावला. अवघ्या वर्षभरातच या तरूण, आक्रमक शिवसेनेने भारताची आर्थिक राजधानी काबीज केली. बाळासाहेबांचं ओघवतं, प्रखर, प्रसंगी शिवराळ आणि शिवसैनिकांची मनं पेटवणारं वक्तृत्व हा शिवसेनेचा कणा होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close