S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज-उद्धवनी एकत्र यावं -बाबासाहेब पुरंदरे
  • महाराष्ट्राच्या भल्यासाठी राज-उद्धवनी एकत्र यावं -बाबासाहेब पुरंदरे

    Published On: Nov 23, 2012 12:31 PM IST | Updated On: Nov 23, 2012 12:31 PM IST

    23 नोव्हेंबरमतभेद दूर करण्याची मनाची तयारी आणि ताकद असते. ऐक व्हा..ऐक येऊन काम करा. जर एक झाले तर महाराष्ट्राचा इतिहास पालटला जाईल. राज साहेब काय ? उद्धव साहेब काय? यांना लहानपणी बोट धरून फिरवलं. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या प्रेमाच मापन करता येणार नाही म्हणून दोघांनी एकत्र यावं, एकत्र राहवं,एकत्र हसावं, एकत्र लढावं आणि एकत्र जिंकावं अशी इच्छा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. तसेच बाळासाहेबांच्या स्मारकाच्या योजना विविध पद्धतीने सुरु होतील. कोणी लायब्ररी काढले, कोणी रस्त्यांना, पुलांना नावं देईल पण बाळासाहेबांचं रक्त आमच्या अंगात सळसळत नाही तोपर्यंत ही सगळी स्मारक थिटी आहे, लहान आहे अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्तकेली. बाबासाहेब पुरंदरे यांनी आयबीएन लोकमतला विशेष मुलाखत दिली यावेळी ते बोलत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत आपण पाहू शकता रात्री 8:30 वाजता फक्त आयबीएन लोकमतवर

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close