S M L
  • विश्वजीत-स्वप्नालीच्या लग्नाचा शाही थाट

    Published On: Dec 7, 2012 04:13 PM IST | Updated On: Dec 7, 2012 04:13 PM IST

    07 डिसेंबरपुण्यात आज एक शाही लग्नाची धांदल सुरू आहे. वनमंत्री पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत आणि उद्योजक अविनाश भोसले यांची मुलगी स्वप्नाली यांचं जंगी लग्न होतंय. बालेवाडी क्रीडानगरी परिसरात अतिशय थाटामाटात हे लग्न होतंय. लग्नासाठी अनेक बडे पाहुणे उपस्थित आहेत. वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तर बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली हीसुध्दा बांधकाम व्यवसायात उद्योजिका आहे. अनेक बड्या नेत्यांनी या शाही लग्नाला हजेरी लावलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व पक्षातील बडे नेत्यांनी हजेरी लावली. या लग्न सोहळ्यानिमित्त राजकारण आणि उद्योजक यांची युती पहायला मिळाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close