S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
  • अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

    Published On: Dec 7, 2012 10:58 AM IST | Updated On: Dec 7, 2012 10:58 AM IST

    07 डिसेंबरसिंचन घोटाळ्यावरुन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार्‍या अजित पवारांचा आज पुन्हा राज्यमंत्रिमंडळात समावेश झाला आहेत. राजभवनातल्या दरबार हॉलमधल्या झालेल्या छोटेखानी सोहळ्यात राज्यपाल के शंकरनारायणन यांनी अजित पवारांना मंत्रिपदाची शपथ दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्रिमंडळातले अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाताना आपल्यावरचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा अजितदादांनी केला. सिंचन पत्रिकेत राज्याची सिंचनाची टक्केवारी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकल्पांच्या किंमती कशामुळे वाढल्या तेही स्पष्ट झालेलं आहे. सर्व प्रमुख प्रकल्पांचा लेखाजोखा देण्यात आलेला आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, तरीसुद्धा विधिमंडळातल्या कुठल्याही चर्चेला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतल्यानंतर बारामती, सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close