S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गुजरातचा रणसंग्राम : मुस्लीम मतदार कुणासोबत ?
  • गुजरातचा रणसंग्राम : मुस्लीम मतदार कुणासोबत ?

    Published On: Dec 8, 2012 01:34 PM IST | Updated On: Dec 8, 2012 01:34 PM IST

    सागरिका घोष, गुजरात08 डिसेंबरगुजरातमध्ये निवडणुकीचा रंग आता चढू लागलाय. पण या निवडणुकीत मुस्लीम मतदारांची भूमिका काय असेल, हा मोठा मुद्दा आहे. गुजरातमधला मुस्लीम समुदाय मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार का ? काय आहेत त्यांच्या भावना याबद्दलचा हा खास रिपोर्ट...आसिफा खान... आधी पत्रकार होती. त्यानंतर काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून काम पाहिलं आणि आज ती भाजपमध्ये आहे. खाडखाड इंग्रजी बोलणारी आसिफा गुजरात भाजपचा नवा मुस्लीम चेहरा आहे. मला वाटतं काँग्रेस कार्यकर्त्यापेक्षा गुजरातचा भाजप कार्यकर्ता चांगलं काम करतोअसं कारण ती भाजपमध्ये येण्याचं सांगते.पण भाजपमधले मुस्लिम उमेदवार निवडून येतील का ?गुजरातमधला फॉरमॅट आता बदललाय. इथे 1990पासून काँग्रेस नाही. त्यामुळे मला वाटतं मुस्लीम जिंकत आहेत. ते आणखी चांगलं काम करतील असा विश्वास आसिफा खान व्यक्त करतेय.मुस्लीम मतदारांपर्यंत पोचण्यासाठी गेल्या वर्षी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सद्भावना यात्रा काढली. सूरतमधले सुफी नेते मेहबूब अली बावा, या सद्भावना यात्रेत अनेकदा गेले होते. उद्योग-व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणार्‍या बोहरा मुस्लीम समुदायाचीही मोदींना साथ मिळेल, अशी शक्यता आहे. पण मोदींनी अजूनतरी एकाही निवडणुकीत मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिलेलं नाही आणि हाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरलाय. मोदींना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे आणि त्यामुळेच ते मुस्लिमांप्रति सद्भावना दाखवत असल्याचं ढोंग करत असल्याचा आरोप होतोय. पण मोदींना मुस्लिमांची मनं अजूनतरी पूर्णपणे जिंकता आलेली नाही. काँग्रेसनंही फक्त व्होट बँकेच्या राजकारणासाठीच मुस्लिमांचा वापर केल्याचीही भावना व्यक्त होतेय. गुजरातमधल्या राजकारणात मुस्लिमांचं प्रतिनिधित्व फक्त 9 टक्के आहे.2002 च्या गुजरात दंगलीचा कलंक लागलेला असला तरी या दंगलींप्रकरणी कोर्टात न्यायही मिळालाय. जवळपास 130जणांवर आरोप सिद्ध झालेत तर जवळपास 100 जणांना आजन्म कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आलीय. न्याया आणि नव्या संधी यामुळे गुजरातमधल्या मुस्लिमांमध्ये आत्मविश्वास वाढतोय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close