S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करूनच दाखवू -सुनील प्रभू
  • शिवाजी पार्कचं नामांतर शिवतीर्थ करूनच दाखवू -सुनील प्रभू

    Published On: Dec 10, 2012 02:51 PM IST | Updated On: Dec 10, 2012 02:51 PM IST

    10 डिसेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक भाषणांमधून शिवाजी पार्कचा आत्मयीतेनं उल्लेख शिवतीर्थ असा केलाय. त्यामागे बाळासाहेब आणि शिवतीर्थ असं एक अतूट नातं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कचे नामांतर शिवतीर्थ व्हावे यासाठी बहुमताच्या जोरावर शिवाजी पार्कचं नाव शिवतीर्थ करूच असा आक्रमक पवित्रा मुंबई महापालिकेचे महापौर सुनील प्रभू यांनी घेतला आहे. तर ज्यांनी कोणी विरोध केला त्यांना महाराष्ट्राचा आणि शिवाजी पार्कचा इतिहास माहित नाही. या काँग्रेस सरकारने नेहमी विरोधात भूमिका घेतली आहे पण शिवाजी महाराज आणि शिवतीर्थ हा समानअर्थी शब्द आहे असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रभूंची पाठराखण केली आहे. मात्र नामांतराला मनसेनं विरोध दर्शवला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close