S M L
  • ...त्यांचा समाचार नववर्षात घेणार -उद्धव

    Published On: Dec 14, 2012 11:31 AM IST | Updated On: Dec 14, 2012 11:31 AM IST

    14 डिसेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद विनाकारण घालण्यात आला. ठाकरे कुटुंबीयांसह समस्त शिवसैनिकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना स्मारकाचा वाद दुर्देवी आहे. पण मी वाद घालणार्‍यांना सोडणार नाही येत्या नववर्षाच्या पहिल्या महिन्यात वाद घालणार्‍यांचा समाचार घेणार आहे असा थेट इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिला. तसंच अजून दुःख संपलं नाही पण तुम्हाला भेटून दुःख हलकं होतं अशा भावना उद्धव यांनी शिवसैनिकांकडे व्यक्त केल्या. शिवसेनेच्या उभारणीसाठी फेब्रुवारी महिन्यात विदर्भात मेळावा घेऊ, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरा शिवसेनाप्रमुख होणे नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला. एकंदरीत बाळासाहेबांच्या स्मारकावरून जोशी सर आणि संजय राऊत यांनी मागणी लावून धरली होती यावर एकाबाजूला शिवसेना आणि दुसर्‍या बाजूला काही दादरकर आणि मनसे असा हा सामना होता. त्यामुळे उद्धव यांचा रोख कोणाकडे आहे हे येणार काळच सांगेल.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close