S M L
  • पामबीच रोडवरील भीषण अपघात कैमर्‍यात कैद

    Published On: Dec 25, 2012 04:15 PM IST | Updated On: May 14, 2013 03:11 PM IST

    25 डिसेंबरनवी मुंबईच्या पाम बीच रोडवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. या फूटेजमध्ये कंटेनर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेली कार कंटेनरवर जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की परिसरात स्फोट झाल्यासारखा आवाज झाला. कार कंटेनरच्या खालून पुढील बाजूला बाहेर निघाली. कारचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. या धडकेत दोन तरूणांचे डोके धडावेगळे झाले,एका तरूणांचे अर्धे डोके कापले गेले. तिघांचाही जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून तर दुसरा तरूण खाली वाकल्यामुळे किरकोळ जखमी झालाय. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close