S M L

आशिया कप विजेत्या बॅटमिंटपटूकडे सरकारचं दुर्लक्ष

20 डिसेंबर, मुंबईउदय जाधवजिद्द आणि महत्त्वाकांक्षा याच्या जोरावर एका अपंगानं आपलं स्वप्न पूर्ण केलंय. गिरीष शर्मा असं त्याचं नाव आहे. त्यानं बॅडमिंटनमध्ये आशिया कप जिंकलायं. पण नंबर वन होऊनही त्याच्याकडे अजून सरकारनं लक्षं दिलेलं नाही.गिरिश दोन वषांर्चा असताना, एका ट्रेन अपघातात त्याचा एक पाय पूर्णपणे कापला गेला. पण अपंगत्व येऊनही त्यानं जिद्दीनं त्याच्यावर मात केली आहे. "लोकांच्या नजरेत मी अपंग आहे, पण मी कधीच स्वत:ला अपंग समजत नाही" असं गिरिशनं सांगितलं.सर्वसामान्य माणसांनाही लाजवेल अशी गिरीशची जिद्द आहे. पण त्याला सरकारचं प्रोत्साहन मात्र मिळत नाही आहे. गिरीशनंआशिया कप मध्ये भारताला सिंगल्स बरोबर डबल्स गेम्समध्येही, गोल्डमॅडल मिळवून दिलं. आर्थिक परिस्थितीमुळे गिरीशला आशिया कपची प्रवेश फीसुद्धा भरता आली नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकूनही त्याला अजून एकही स्पॉन्सर मिळालेला नाही. "आशिया कपमध्ये ब्राँझ मेडल मिळवलेल्या पाकिस्तानी टीमला त्यांच्या सरकारनं 5 लाख रुपये दिले. मला मात्र अजून एक रुपयेही मिळालेला नाही" असं गिरिशनं सांगितलं. गिरिशसारख्या कर्तबगार मुलांना सरकारनं प्रोत्साहन द्यायला हवं, अशी अपेक्षा गिरिशचे कोच श्रीकांत वाड यांनी व्यक्त केली.गिरिशने आशिया कप भारताला जिंकून दिलाय. आणि त्याचं आता लक्ष आहे ते वर्ल्ड कप जिंकण्याचं. त्यासाठी सरकारचं पाठबळ त्याला मिळणार का ? हा खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2008 09:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2008 09:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close