S M L
  • पुणेकरांसाठी समुद्री दुनियेची सफर

    Published On: Dec 26, 2012 04:02 PM IST | Updated On: Dec 26, 2012 04:02 PM IST

    26 डिसेंबरपुण्यातील गणेश कला - क्रीडा मंदिरात सध्या ऍक्वा एक्झिबिशन सुरू आहे. या ऍक्वा एक्झिबिशनमुळे पुणेकरांना समुद्राची सैर करता येणं शक्य झालं आहे. या ऍक्वा एक्झिबिशनमध्ये समुद्रातील माशांच्या विविध जाती - प्रजाती आणि समुद्रातील वनस्पती प्रेक्षकांना पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. तसंच समुद्रातील माशाची आणि वनस्पतीची अंडरवॉटर फोटोग्राफीसुद्धा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. लोकांमध्ये माशांबद्दल आवड निर्माण व्हावी याकरिता या ऍक्वा एक्झिबिशन आयोजित करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close