S M L
  • गोल्डमॅनचं 'वस्त्रहरण'

    Published On: Dec 27, 2012 05:27 PM IST | Updated On: Dec 27, 2012 05:27 PM IST

    27 डिसेंबर'हौसेला मोल नसतं' असं नेहमी म्हटलं जात याचंच एक 'गोल्डन'उदाहरण पुण्यात पाह्याला मिळालं. पिंपरी येथील रहिवारी दत्ता फुगे यांनी साडेतीन किलो वजनाचा दीड कोटी रुपये किंमतीचा सोन्याचा शर्ट तयार केलाय. याव्यतिरिक्तही दत्ता फुगे यांच्याकडे अंगावर साडे चार किलो सोन्याचे दागिने आहेत. दत्ता फुगे यांच्या अंगावर सोन्याचा शर्ट आणि दागिने असं सर्वकाही मिळून हा 'गोल्ड मॅन' दहा किलो सोन्यानी सजला आहे. पण एवढा सगळा खटाटोप कशासाठी असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उपस्थित झाला. पण या प्रश्नाचं उत्तर दस्तरखुद्द दत्ता फुगे यांनी दिलंय. माझा हा सगळा खटाटोप प्रसिद्धीसाठी असून मला खासदार व्हायचं आहे पक्षाने जर माझी दखल घेतली तर शिरूरमधून निवडणूक लढवेल अशी 'गोल्डन' इच्छाही बोलून दाखवलीय. दत्ता फुगे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी सीमा फुगे या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहे. जगापेक्षा वेगळं करण्यासाठी मी सोनं खरेदी केलं. लोकं गाड्या घेतात मी सोनं घेतलं अशी पुस्तीही फुगे यांनी जोडली. पुण्यात दोन किलो सोनं अंगावर घालणार्‍या व्यक्तीला आमदार म्हणतात अशा शब्दात रमेश वांजळे यांच्यावर टीका झाली होती. आणि आता हे गोल्ड मॅन महोदय दहा किलोचे असल्यामुळे त्याना टीकेला सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close