S M L
  • नारायण राणेंची पत्रकारांना दमदाटी

    Published On: Jan 3, 2013 01:02 PM IST | Updated On: Jan 3, 2013 01:02 PM IST

    03 जानेवारीराज्याच्या नव्या औद्योगिक धोरणाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाब्दिक नारायण राणे आणि पत्रकारांमध्ये खडाजंगी झाली. या परिषदेत नारायण राणेंनी औद्योगिक धोरणाच्या निर्णयाबाबत चुकीच्या बातम्या देण्यात आल्याचा आरोप केला. तर या धोरणाबाबत मोटिव्हेटेड रिपोर्टिंग करून गैरसमज पसरवण्यात आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केला. सेझ बदलून आता आयआयझेड हे नवी धोरण सरकारने जाहीर केलंय. सेझसाठी अधिग्रहीत केलेल्या 27 हजार हेक्टर जमिनीपैकी 60 टक्के जमिनीचा वापर उद्योगांसाठी तर 40 टक्के निवासी करणासाठी होणार आहे. त्यामुळे या धोरणावर मंत्रिमंडळातूनच टीका झालीय याबद्दलच एका पत्रकाराने वर्षभर यावर हेच चिंतन केलं का ? असा सवाल विचारला असता नारायण राणे भडकले. तुम्हाला असा प्रश्नविचारण्याचा अधिकार नाही. तुम्ही कोण विचारणारे ? तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणं बंधनकारक नाही अशी भाषाच राणेंनी वापरली. मुख्यमंत्र्यांनीही पत्रकारांच्या प्रश्नाला सहमत दर्शवली होती. पण 'चिंतन' या शब्दावरून राणेंनी पत्रकारांनाच दमदाटी केली. सरकारच्या या भूमिकेवर पत्रकार परिषदेतच पत्रकारांनी उघड नाराजी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close