S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'महिलांनो, सोबत चाकू ठेवा वेळ आलीतर हल्लाही करा'
  • 'महिलांनो, सोबत चाकू ठेवा वेळ आलीतर हल्लाही करा'

    Published On: Jan 3, 2013 03:41 PM IST | Updated On: Jan 3, 2013 03:41 PM IST

    03 जानेवारीसोबत मिरची पावडर ठेवा, चाकूही ठेवा कोणी छेडछाड काढली तर त्याचावर मिरचीपूड फेका वेळ आली तर चाकूने वारही करा कसा खतरनाक सल्ला दिलाय पुण्याचे पोलीस आयुक्त गूलाबराव पोळ यांनी. गुलाबराव पोळ एवढ्यावरच थांबले नाही छेडछाड काढणार्‍यांवर चाकूने हल्ला करा पण त्याला ठार मारू नका अशा प्रकरणात भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा राहिलं असं आवाहनही पोळ यांनी केलं. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा कसा घालता येईल, यावर पुण्यात महिला सुरक्षाविषयक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चेत महिला नगरसेवक, आमदार, खासदार, सामाजिक कायर्कर्त्यो मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close