S M L
  • "ज्वारी..ज्वारी जाती जडं, हाताला आले फोडं"

    Published On: Jan 5, 2013 02:32 PM IST | Updated On: Jan 5, 2013 02:32 PM IST

    साहेबराव कोकणे, अहमदनगर 05 जानेवारीराज्यात दुष्काळाचं सावट आहे. एरव्ही हसत-मुखत येणारा सुगीचा हंगाम यंदा काहीसा सुन्न आहे. पण अशा परिस्थितीतही अहमदनगर जिल्ह्याच्या नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात लोकगीतांचा बहर सुरू आहे.दुष्काळाचं सावट आहे... असं हे दुसरं वर्ष. कोरडवाहू शेतकर्‍यासाठी तर आता जे पिक आलंय त्यावरच समाधान मानायची वेळ आहे. अशातच अहमदनगर जिल्ह्यात गावागावातील शेतातून भलरीचे सूर ऐकायला मिळत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही लोकगीतं दरवर्षी शेतांमध्ये ऐकायला मिळतात. तिही सुगीच्या दिवसात. शेतमजूर नाहीत आणि परवडतही नाहीत म्हणून ऐकमेकांच्या शेतात जाऊन काम करण्याची ही परंपरा. कापणी करताना उत्साह वाढावा म्हणून ही गाणी सामुहीकपणे म्हटली जातात. भलरी हा शब्द शेतातल्या कष्टाशी जोडलेला आहे. शेतकरी महिला असो की पुरुष... भलरी लिहीत किंवा वाचली जात नाही. तर ती शेतातल्या कष्टकर्‍यांचं जगणं असतं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close