S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कोत्तापल्ले यांचं भाषण उधळून लावू -लक्ष्मण माने
  • कोत्तापल्ले यांचं भाषण उधळून लावू -लक्ष्मण माने

    Published On: Jan 9, 2013 12:41 PM IST | Updated On: Jan 9, 2013 12:41 PM IST

    09 जानेवारीचिपळूण इथं होणार्‍या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील वाद आता आणखी तीव्र झाला आहे. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्राला अनेकांनी आक्षेप घेतलाय. आता लेखक लक्ष्मण माने यांनी तर संमेलन उधळून लावण्याची धमकी दिलीये. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचं चित्र जातीयता दर्शवणारं आहे, तसंच ते पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे ते वेळीच हटवण्यात यावं अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा लक्ष्मण माने यांनी दिलाय. तसंच संमेलनासाठी आमदारांनी दिलेला निधी दुष्काळग्रस्त भागासाठी दिला जावा अशी मागणीही त्यांनी केली. अशा संमेलनावर नागनाथ कोत्तापल्ले यांनी बहिष्कार टाकावा नाहीतर आम्ही त्यांचं भाषण उधळून लावू असा इशाराही माने यांनी दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close