S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'राज यांच्या पीएने उमेदवारीसाठी 5 लाख रूपये घेतले'
  • 'राज यांच्या पीएने उमेदवारीसाठी 5 लाख रूपये घेतले'

    Published On: Jan 9, 2013 02:32 PM IST | Updated On: Jan 9, 2013 02:32 PM IST

    09 जानेवारीमाझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय. या बडव्यांची संख्याही वाढलीय. बडवे जे सांगतात साहेब त्यांचं ऐकतात. त्यांच्या जवळची ही लोकं आर्थिक व्यवहार करतात. माझी उमेदवारी निश्चित करण्यासाठी माझ्या नातेवाईकांकडे, पैशांची मागणी केली. राज ठाकरेंच्या पीएनी उमेदवारीसाठी 5 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप मनसेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलाय. बुधवारी मनसेचे मराडवाड्यातील कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मनसेमध्ये आपली घुसमट होत असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिलाय.मनसेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर जाधव यांनी जखमावरच्या खपल्या काढायला सुरूवात केली. माझ्याकडून उमेदवारीसाठी राज ठाकरेंच्या पीएनी 5 लाख रूपये घेतले. तिकीट घेण्यासाठी इतर उमेदरवारासारखी धडपड केली. जर पक्षप्रमुखांकडे याबद्दल सांगितलं असतं तर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला असता म्हणून मी याकडे कानाडोळा केला. पक्षाचे धोरण सध्या व्यवस्थित नाही. पक्षाला दिशाच नाहीय. मला जेव्हा पोलिसांकडून मारहाण झाली तेव्हा राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली होती. ही सभाच नव्हती त्यांनी तोंडाला पाणं पुसली होती. यानंतर झालेल्या अधिवेशनात मारहाण प्रश्नी मनसे बॅकफूटवर गेली. आपल्याच आमदाराच्या मारहाणीचा प्रश्न पक्षाने उचलला नाही. मी राज यांना याबद्दल विचारले असता 'राज्यात तुझाचं प्रश्न मोठा आहे का? इतरही अनेक समस्या आहे' असं उत्तर दिलं होतं. एवढेच नाहीतर औरंगाबाद नगरपरिषदेत बिनधास्तपणे मनसेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. ज्यांना शिव्या दिल्या त्यांच्याशी कशी हातमिळवणी केली. हे कोणतं राजकारण ? अशी व्यथा हर्षवर्धन जाधव यांनी आयबीएन लोकमतकडे मांडली. राज ठाकरे यांचा करिश्मा मोठा आहे. यामुळे अनेक तरूण त्यांच्याकडे ओढावले जातात. मीही त्यातला एक आहे. पण नेतृत्व गुणाचा अभाव असल्यामुळे भ्रमनिराशा होते असं माझ्या सोबतही झालं मी पक्षाचा राजीनामा दिलाय. मराठवाड्यात जे काही मनसेची जी मंडळी काम करते ती 'मनसे द्या दोनशे' असंच काही काम करते मला या गोष्टींचा वैताग आला होता म्हणून आमदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. कोणीही एवढ्याशा कारणासाठी कोणीही राजीनामा देत नसतो पण माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. सगळेच पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे त्यामुळे भविष्यात आपण अपक्ष म्हणून लढणार आहे असंही जाधव यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close