S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • फायर ब्रिगेडच्या जिगरबाज जवानांना राष्ट्रपती पदक प्रदान
  • फायर ब्रिगेडच्या जिगरबाज जवानांना राष्ट्रपती पदक प्रदान

    Published On: Jan 9, 2013 05:27 PM IST | Updated On: Jan 9, 2013 05:27 PM IST

    09 जानेवारी26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावणार्‍या मुंबई फायर ब्रिगेडच्या जवानांना अखेर न्याय मिळालाय.. मुंबई फायर ब्रिगेडच्या 7 अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक अखेर प्रदान केलं. चार वर्षानंतर त्यांना हे राष्ट्रपती पदक दिलं गेलंय. या मुंबई फायर ब्रिगेडच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून 300हून अधिक नागरिकांचा जीव वाचवला होता. त्यांच्या या शौर्याबद्दल पाच फायर ब्रिगेडचे अधिकारी आणि दोन जवानांना साडे तीन वर्षापूर्वी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं होतं. पण आज त्याना हे पदक प्रदान करण्यात आलं. या बातमीचा आयबीएन लोकमतने सतत पाठपुरावा केला. पदक प्रदान झाल्यानंतर जवानांनी आम्हाला आमचा सन्मान मिळाला अशी प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close