S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'साहित्यिक राजकारणात येतात मग राजकारण्यांना विरोध का?'
  • 'साहित्यिक राजकारणात येतात मग राजकारण्यांना विरोध का?'

    Published On: Jan 11, 2013 04:54 PM IST | Updated On: Jan 11, 2013 04:54 PM IST

    11 जानेवारीआम्ही राजकारणी लोकांनी लेखणी हातात घ्यायची नाही. राजकारणी जर संमेलनात आले तर वाद होतो आणि जर साहित्यक राजकारणात आले तर आम्ही कधी वाद घालत नाही. पिण्याच्या पाण्यासारख उत्तम लिखान करणारे आचार्य अत्रे विधानसभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून आले विरोधीपक्ष नेते म्हणून उत्तम कामगिरी केली त्याचा आनंद थोडा आहे. अलीकडच्या काळात निसर्गावर, शेतीवर काव्य करणारे ना.धो महानोर राज्याच्या विधिमंडळामध्ये आले त्यांनाही कुठे विरोध केल्याचं नमुद नाहीय असं सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी साहित्यकांचे चांगलेच कान उपटले. तसंच हमीद दलवाईंच्या घरापासून ग्रंथदिंडी काढण्यास विरोध का होता हे मला कळले नाही. दलवाईंचे साहित्य क्षेत्रात योगदान मोलाचे आहे. त्यांचे योगदान हे आपण विसरू शकत नाही. पण त्यांच्या घरापासून दिंडी काढण्याचा अधिकार साहित्य समजणार्‍यांना नक्की असेल. त्याठिकाणाहून दिंडी निघणे अवशक्य होते. पण त्याला विरोध का केला हे मला समजू शकलं नाही असं सांगत शरद पवार यांनी ग्रंथदिंडीच्या वादावर खंत व्यक्त केली. 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close