S M L
  • मिर्ची पुड घ्या आणि स्वरक्षण करा !

    Published On: Jan 14, 2013 03:27 PM IST | Updated On: Jan 14, 2013 03:27 PM IST

    14 जानेवारीशिवसेनेची अंगिकृत संघटना असलेल्या युवासेनेतर्फे आज मकर संक्रांतीनिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.युवासेनेच्या वतीने दादरच्या किर्ती कॉलेजच्या विद्यार्थीनींना स्वसंरक्षणासाठी मिर्ची पावडरचं वाटप करण्यात आलं. अलिकडे घडत असलेल्या बलात्काराच्या घटना आणि त्या रोखण्यात सरकारी यंत्रणेला आलेलं अपयश पाहाता हा उपक्रम राबवल्याचं युवासेनेच्या वतीने सांगण्यात आलं. मुंबई आणि राज्यभरातल्या इतर महाविद्यालयातही मिर्ची पूडचं वाटप करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close