S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पाकचा खोटारडेपणा,भारताच्या हद्दीत पेरले लँडमाईन
  • पाकचा खोटारडेपणा,भारताच्या हद्दीत पेरले लँडमाईन

    Published On: Jan 16, 2013 04:30 PM IST | Updated On: Jan 16, 2013 04:30 PM IST

    16 जानेवारीभारताच्या कडक भूमिकेनंतर आता पाकिस्ताननं आपल्या लष्कराला शस्त्रसंधीचं उल्लंघन न करण्याचे आदेश दिलेत. दुसरीकडे शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा भारताचा दावा पाकिस्तान मात्र सतत फेटाळून लावतंय. पण हा दावा खरा ठरवणारा पुरावा भारतीय लष्कराच्या हाती लागलाय. भारतीय हद्दीत सापडलेल्या पाकिस्तानी बनावटीच्या लँडमाईन्सचे फोटो लष्करानं प्रसिद्ध केले आहेत. पण पाकिस्ताननं मात्र भारतावरच युद्धखोरीचा आरोप केलाय. हा आहे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा पाडणारा धडधडीत पुरावा...नियंत्रण रेषेवर भारताच्या हद्दीत सापडलेले हे पाकिस्तानी लँडमाईन्स...पाकिस्तानच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत याची निर्मिती झालीय. भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी हे लँडमाईन्स पेरले होते. सोमवारी झालेल्या दोन्ही देशांच्या फ्लॅग मीटिंगमध्ये हा पुरावा पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांना देण्यात आला.पण भारताची कोणतीच गोष्ट मान्य करायची नाही, हा पाकचा निर्धार कायम आहे...पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी भारतालाच युद्धखोर म्हटलंय.पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं आणि आम्ही त्यांनी उत्तर देतो, असं लष्करप्रमुखांनी म्हटलंय.दरम्यान, पाकिस्तानच्या आगळिकीचा मुद्दा भारतानं संयुक्त राष्ट्रासमोर मांडलाय. भारतानं म्हटलंय.भारताची संयुक्त राष्ट्राला हाक'दहशतवादी संघटनांचा मुकाबला करताना किंवा दहशतवादाचं जाळं उखडून टाकताना आंतरराष्ट्रीय समुदायानं सोयीची भूमिका घेऊ नये. धोरण म्हणून दहशतवादाचा वापर करणार्‍या देशाकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. अशा मार्गावर जाणारे देश स्वत:चं नुकसान करून घेत आहेत.' नियंत्रण रेषेवरच्या घटनांनंतर पाकिस्तानशी नेहमीसारखा व्यवहार करणं शक्य नाही, असं मंगळवारीच पंतप्रधानांनी ठणकावलं होतं. त्यावर चर्चा प्रक्रिया थांबता कामा नये, असं पाकिस्ताननं म्हटलंय.पण पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर द्यायला हवं, ही भाजपची मागणी कायम आहे. डाव्यांनी मात्र चर्चेचा मार्गच योग्य असल्याचं म्हटलं आहे. भारत-पाकमधले राजकीय संबंध कमालीचे ताणले असताना नियंत्रण रेषेवर मात्र पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. फ्लॅग मीटिंनंतर पाकिस्तानी सैनिकांनी तब्बल 4 वेळा गोळीबार केला. एक देश म्हणून आपण गंभीर नाही आहोत, हेच पाकिस्तान आपल्या कृत्यातून दाखवून देतंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close