S M L
  • फेरीवाल्यांना संरक्षण देऊ -आठवले

    Published On: Jan 18, 2013 01:06 PM IST | Updated On: Jan 18, 2013 01:06 PM IST

    19 जानेवारीमनसे सैनिकांना एवढीच जर दादागिरी दाखवायची असेल तर त्यांनी भारताच्या सीमेवर जाऊन दादागिरी दाखवावी विनाकारण गरीब फेरीवाल्यांवर दमबाजी करू नये जर मनसे फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरली तर रिपाईचे कार्यकर्ते त्या फेरीवाल्यांना संरक्षण देतील अशा थेट आव्हान रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. तसंच शाळेच्या दाखल्यावर जात असलीच पाहिजे. जर दाखल्यावर जातीचा उल्लेख केला नाही तर विद्यार्थ्यांना शिष्यवृर्ती,आरक्षणापासून वंचित राहावे लागेल त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दलितविरोधी आहे अशी टीकाही आठवले यांनी केली.फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे एसीपी वसंत ठोबळे यांची बदली करण्यात आली त्यामुळे अनेकांनी या कारवाईचं समर्थन केलं तर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून विरोध दर्शवला. स्थानिकांच्या आंदोलनानंतर आता राजकीय आखाडाही तापू लागलाय. येत्या सोमवारी 21 जानेवारी रोजी पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाले मोर्चा काढणार आहे. मात्र फेरीवाल्यांनी मोर्चा काढून आपली ताकद दाखवली तर त्या दिवशी आणि त्यादिवसानंतर फुटपाथवर प्रत्येक परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असा थेट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. पण आता फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी रिपाईपुढे सरसावली आहे. मनसेला दादागिरी करण्याची एवढीच जर हौस असले तर त्यांनी सीमेवर जाऊन दादागिरी दाखवावी जर मनसेनं फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल दाखवण्याचा प्रयत्न केला तर रिपाईचे सैनिक फेरीवाल्यांच्या संरक्षणासाठी धावू जातील असं थेट आव्हान रामदास आठवले यांनी दिलं आहे. त्याचबरोबर गुरूवारी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाळेच्या दाखल्यावर जात नसावी आणि दलितांचं राजकीय आरक्षण रद्द करावं अशी मागणी केली होती. आंबेडकरांच्या या भूमिकेला आठवलेंनी कडाडून विरोध केला आहे. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असलाच पाहिजे. जर जातीचा उल्लेख नसला तर विद्यार्थ्यांना आरक्षण,शिष्यवृती संपुष्टात येईल. आपल्याकडे सर्वांना बोलण्यात,मत मांडण्याचा अधिकार आहे म्हणून काहीही बोलावे याला अर्थ नाही. प्रकाश आंबेडकरांची भूमिका दलित विरोधी आहे अशी टीकाही आठवले यांनी केली. दाखवल्यावर जात,धर्माचा उल्लेख असलाच पाहिजे असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. आता सोमवारी फेरीवाल्यांचा मोर्चा निघणार आहे या मुद्यावरून मनसे आणि रिपाई पुन्हा एकदा आमनेसामने आली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close