S M L
  • मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

    Published On: Jan 19, 2013 03:37 PM IST | Updated On: Jan 19, 2013 03:37 PM IST

    19 जानेवारीराहुल गांधी यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. राहुल गांधी यांनीही उपाध्यक्षपद स्विकारले आहे अशी घोषणा काँग्रेसचे नेते जनार्दन द्विवेदी यांनी केली. राहुल गांधींच्या उपाध्यक्षपदाची निवडीची घोषणा होताच मुंबईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मुंबईतील टिळक भवनासमोर राहुल गांधी यांच्या नावाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close