S M L
  • दिग्विजय सिंग म्हणतात, हाफीज सईद 'साहेब'

    Published On: Jan 21, 2013 11:21 AM IST | Updated On: Jan 21, 2013 11:21 AM IST

    21 जानेवारीमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात 197 जणांना प्राण गमवावे लागले तर हेमंत करकरे, विजय साळसकर,अशोक कामटे यांच्यासह अनेक जाबाज अधिकारी,जवान शहीद झाले. ज्या हल्ल्यामुळे मुंबईनं खूप काही गमावलं त्या हल्ल्यामागच्या मास्टरमाईंड हाफीज सईदला साहेब म्हणून काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी भयंकर गौरव केलाय. हाफीज सईदचा दहशतवादी हल्ल्यात हात आहे हे उघड आहे. पाकिस्तान सरकार सुद्धा दहशतवाद्यांना संरक्षण देते अशी टीकाही सिंग यांनी केली. तसंच सिंग यांनी सुशीलकुमार शिंदे यांचं समर्थन केलंय. मी कित्येक वर्षांपासून सांगतोय की, संघात काही लोकं अशी आहेत जी दहशतवादी बनवण्यासाठी प्रशिक्षण देते आणि दहशतवादी कृत्यात सहभागी पण आहे. संघाचे बॉम्बस्फोटांचे प्रशिक्षण देण्याच्या छावण्या लागल्यात आहे याचे पुरावे सुध्दा आहे असा आरोपही त्यांनी केला. दिग्विजय यांनी या आधी लादेन बद्दलही अशाच प्रकारचे उद्गार काढलेले आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close