S M L
  • 'मुलगी जन्माला आली तर प्रसूती विनामूल्य'

    Published On: Jan 22, 2013 12:22 PM IST | Updated On: Jan 22, 2013 12:22 PM IST

    22 जानेवारीस्त्री भ्रूण हत्यांच्या घटनामंध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या सध्याच्या काळात पुण्यातल्या एका डॉक्टरांनी मात्र एक वेगळा आदर्श घालून दिलाय. हडपसर इथल्या डॉ. गणेश रख यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आली तर प्रसूती विनामुल्य करण्याचा उपक्रम सुरू केलाय. डॉ.रख यांच्या पुणे मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जन्माला येणार्‍या मुलीचं इथे उत्साहात स्वागत केलं जातं. मिठाई वाटून नवजात मुलीच्या तिच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या जातात. आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये एकूण 135 स्त्रिया प्रसूत झाल्या आहेत. स्त्री भ्रूणहत्यांच्या प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉ. सहभागी असण्याच्या सध्याच्या काळात डॉ. गणेश रख यांनी स्वत:च्या उदाहरणाने एक नवा आदर्श घालून दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close