S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आता महाराष्ट्र हीच कर्मभूमी,राज्यभर संघर्ष यात्रा काढणार -मुंडे
  • आता महाराष्ट्र हीच कर्मभूमी,राज्यभर संघर्ष यात्रा काढणार -मुंडे

    Published On: Jan 24, 2013 04:57 PM IST | Updated On: Jan 24, 2013 04:57 PM IST

    24 जानेवारीनितीन गडकरी यांनी माझं कधी खच्चीकरण केलं नाही. त्यांच्यात आणि माझ्यात कोणतेही वैयक्तीक मतभेद नव्हते. पण पक्ष चालवण्यासाठी आमच्यात काही मतभेद होते. याबद्दल मी जाहीररित्या दोनवेळा माझं स्पष्ट मत जाहीर केलं होतं. पक्षश्रेष्ठींनी आमच्यातला वाद मिटवलाही होता पण ते मतभेद पक्षाबाबत होते आमच्यात मतभेद होते पण मनभेद नव्हते अशी कबुली भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. गडकरी यांच्या राजीनाम्यानंतर आयबीएन लोकमतचे संपादक निखील वागळे यांनी गोपीनाथ मुंडे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. येणार्‍या निवडणुकीत सत्ताधार्‍यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. येत्या चार महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार असून यामध्ये प्रामुख्याने दुष्काळ आणि सिंचन घोटाळ्याबाबत जनजागृती करणार आहे. यासाठी सर्व सहकार्‍यांना घेऊन पुन्हा एकदा संघर्ष यात्रा काढणार असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं. तसंच ही संघर्ष यात्रा मुख्यमंत्रीपदासाठी नाही. शिवसेनेचा नेता उद्या मुख्यमंत्री झाला तर माझा त्याला पाठिंबा राहिलं. जर युतीने माझ्यावर जबाबदारी टाकली तर ती पेलण्यासाठी मी समर्थ आहे अशी मुख्यमंत्रीपदाची इच्छा मुंडे यांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर आता महाराष्ट्रच आपली कर्मभूमी आहे. आपण दिल्लीत काम करणार नाहीत. काँग्रेसला आता पराभवाच्या खाईत ढकलण्यासाठी राज्यातच काम करणार असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. एकंदरीच राजकारणाच्या सारीपाटावर 'वेळ' सगळ्यांचा येतो असंच काही मुंडेंनी न कळत सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close