S M L
  • नागपूरमध्ये तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी

    Published On: Jan 26, 2013 11:23 AM IST | Updated On: Jan 26, 2013 11:23 AM IST

    26 जानेवारीनागपूरमध्ये शहरातल्या प्रसिद्ध फुटाळा तलावाजवळच्या प्रशस्त रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून काही धाडसी युवक बाईक स्टंट करतात. यासाठी त्यांना कुठलंही शास्त्रशुध्द प्रशिक्षण नसतं किंवा स्टंट करताना कुठलेही सुरक्षेचे उपायही केले जात नाही. कधी विना हेल्मेट तर कधी साधं हेल्मट घालून हे युवक या कसरती करत असतात. हे स्टंट करताना काही अपघात घडण्याची शक्यता असते. असा काही अपघात घडल्यास जबाबदार कोण असा सवाल विचारण्यात येतोय. पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्यानं गेली काही वर्ष हे स्टंट सुरूच आहे. पोलीस निरीक्षक विजय महंत यांना याबद्दल विचारले असता, स्टंटबाज तरूणांवर आम्ही कारवाई करत असतो वेळप्रसंगी गाड्याही जप्त करत असतो पण पोलिसांच्या धाकाबरोबरच पालकांचाही धाक असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close