S M L
  • लेकराला रानावर टाकून तोडीवरच जीणं !

    Published On: Jan 26, 2013 04:18 PM IST | Updated On: Jan 26, 2013 04:18 PM IST

    माधव सावरगावे, बीड26 जानेवारीवर्षानुवर्ष ऊसतोड मजूर म्हणून काम करणार्‍या महिला तरी सुरक्षित आहेत का ? ऊसतोडीवर असतानाच प्रसूती होणं, लेकराबाळाची ओढ असूनही रानावर टाकून जाणं, हे नेहमीचच. किमान प्रसूती होण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी लेकरं सांभाळण्याची सोय करण्याची मागणी ऊसतोड मजूर महिला करत आहे.पहाटं उठायचं..7 वाजता रानावर जायचं..लेकरं खाली टेकायचं आणि कामाला लागायचं अशी व्यथा ऊसतोड कामगार सारिका उमप हिने मांडली.ऊसतोडीसाठी उघडयावर आलेल्या कुटुंबातल्या महिलांची ही व्यथा. सहा महिने गावाकडे आणि उरलेले सहा महिने ऊसतोडीसाठी स्थलांतर. मग जिथे कारखाना तिथे मजूरांची कुटुंब पाल टाकतात. आणि पूर्ण कुटुंबाची फरफट सुरु होते. सारिका 6 महिन्याची गरोदर आहे. पण तिच्यासाठी कोणत्याही आरोग्याच्या सोयी नाहीत. इतर मजूर महिलांसारखीच तिची प्रसूतीही कोणत्याही सुविधा नसताना इथेच होणार.. हे मानण्यावाचून तिला पर्याय नाही. उपचारासाठी पैसे नाहीत आणि त्यात सक्तीने तिला कामावर जावं लागतं. बर्‍याचदा मजूर महिला लैंगिक शोषणाच्या बळीही पडतात. शिवाय कोयत्याची पद्धत असल्याने महिलांचं खूप शोषण होतं. महिलांसाठी कामाचं ठिकाण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरंतर साखर कारखाने आणि शेतमालक यांची आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close