S M L
  • आज दादूचा दिवस नाही -राज

    Published On: Jan 30, 2013 05:43 PM IST | Updated On: Jan 30, 2013 05:43 PM IST

    30 जानेवारीआज हा दादांचा (मधुकर सरपोतदार) दिवस आहे दादूचा (उद्धव ठाकरे) नाही. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत जे काही आवाहन केले आहे त्यावर योग्य वेळी,योग्य ठिकाणी उत्तर देईल अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली. एकत्र येण्याचा प्रश्न दोघांनाही एकत्र बसवून विचारा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेत यायला कोणी तयार असेल तर मी त्यांचं स्वागतच करेन इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी मनसेबाबत भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनला राज ठाकरे कसा प्रतिसाद देतात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण राज यांनी यावर बोलण्यास तुर्तास टाळलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close