S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • सोनई हत्याकांड:खटला नगर बाहेर चालवण्याची कुटुंबीयांची मागणी
  • सोनई हत्याकांड:खटला नगर बाहेर चालवण्याची कुटुंबीयांची मागणी

    Published On: Jan 31, 2013 05:16 PM IST | Updated On: Jan 31, 2013 05:16 PM IST

    दीप्ती राऊत, नेवासा, अहमदनगर31 जानेवारीअहमदनगर जिल्ह्यात सोनईचं तिहेरी हत्याकांड प्रकरण प्रेमसंबंधातून झाल्याचा आरोप आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केला. याप्रकरणी कुठलाही राजकीय दबाव नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणाचा खटला अहमदनगरच्या बाहेर चालवण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.तब्बल एक महिन्यानंतर सोनईच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाकडे आता कुठे राजकीय नेत्यांचं लक्ष गेलंय. आरपीआय नेते रामदास आठवले यांनी पीडित कुटुंबाची आज भेट घेतली. या हत्याकांडामागे आंतरजातीय प्रेमसंबंध असल्याचा जाहीर उल्लेख झाला. दरम्यान, आज श्रीरामपूर कोर्टाने पीडितांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. दबावामुळे नेवासा सोडवा लागलेल्या ह्या कुटुंबानं हा खटला अहमदनगर जिल्ह्याबाहेर चालवावा अशी मागणी इथल्या दहशतीच्या वातावरणामुळे केली.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करु, असं आश्वासन गृहमंत्री आर आर.पाटील यांनी दिलंय. आत्तापर्यंत हे प्रकरण उघडकीस आणण्यार्‍या अहमदनगर पोलिसांची यापुढे तपासाच्या दृष्टीनं खरी कसोटी लागणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close