S M L
  • नेहरू इतकेचं मोदी लोकप्रिय -सिंघल

    Published On: Feb 6, 2013 11:01 AM IST | Updated On: Feb 6, 2013 11:01 AM IST

    06 फेब्रुवारीपंतप्रधानपदाच्या शर्यतीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांचे नाव सर्वात पुढे आहे. आता विहिपने मोदींच्या नावाला खो देऊन नवा वाद निर्माण केला आहे. विश्वहिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची तुलना भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे पंडित नेहरू पंतप्रधान व्हावे अशी लोकांची मागणी होती. पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी लोकांमध्ये जशी उत्सुकता होती, तशीच उत्सुकता मोदींच्याबाबतीत लागू होत आहे, अशी प्रतिक्रिया सिंघल यांनी दिली आहे. सिंघल यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सिंघल यांच्या वक्तव्यावर काँग्रेस काय उत्तर देते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. सपाचा भाजप नेत्यांना इशारातर दुसरीकडे समाजवादी पक्षानं भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. कुंभ मेळ्यात राजकारण करायचा प्रयत्न केला तर भाजप नेत्यांना कुभंमेळ्यात यायला बंदी घालू, असा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे. तर भाजपनंही याला सडेतोड उत्तर दिलंय. दरम्यान विश्व हिंदू परिषदेची आज दुसर्‍यांदा बैठक घेणार आहे. मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं का, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close