S M L
  • शहीदांच्या कुटुंबीयांचा संघर्ष अखेर संपला

    Published On: Feb 9, 2013 03:00 PM IST | Updated On: Feb 9, 2013 03:00 PM IST

    09 फेब्रुवारीसंसदेवर हल्ला करणार्‍या अतिरेकी अफझल गुरूला फाशी झाल्यामुळे हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केलं आहे. आम्ही राष्ट्रपतींचे आभारी आहोत. त्यांनी अफझलच्या फाशीची अंमलबजावणी केली. आम्हाला 12 वर्ष या दिवसासाठी वाट पाहावी लागली. आम्ही खूप आशा लावून होती. माझ्या पतीला मिळालेले सन्मानपदकही आम्ही संसदेत जमा केले होते. ज्यावेळेस अफझलला फासावर लटकावले जाईल तेव्हाच आम्ही परत घेऊ असा आम्ही निर्धार केला होता. पण 'देर आये दुरुस्त आये' अखेर आज हा दिवस उजाडला आम्हाला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया शहीद कॉन्स्टेबल विजेंदर सिंग यांच्या पत्नींनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close