S M L
  • 'पवारांनी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला'

    Published On: Feb 18, 2013 02:19 PM IST | Updated On: Feb 18, 2013 02:19 PM IST

    18 फेब्रुवारीशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी काकांसारखं (शरद पवार) मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही. शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली, पक्षातून बाहेर पडले. पण बाहेर पडून काही जमलं नाही,झेपलं नाही म्हणून पुन्हा लोटांगण घालत काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना मोर्चा काढला. या मोर्चेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज विविध कामगार संघटना मोर्चा काढण्यात आला. वाढती महागाई आणि सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा मोर्चा आझाद मैदानावर धडकला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली. बारावीच्या परीक्षा सरकारने पुढे ढकलाव्यात किंवा कामगारांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि सरकारच्या विरोधात सर्व कामगार संघटनांनी एकत्र यावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. जर 1999 साली युती सरकार सत्तेत आलं असतं तर अजित पवार सारखा बिनकामाचा उपमुख्यमंत्री कोठे वाहून गेला असता हे कळले सुद्धा नसते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी काकांसारखं (शरद पवार) मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली नाही. शरद पवारांना सोनिया गांधी यांनी पक्षातून हाकलून दिलं होतं. त्यांनी काँग्रेसवर टीका केली. पण बाहेर पडून काही जमलं नाही, झेपलं नाही, आपली काही किंमत नाही म्हणून पुन्हा लोटांगण घालत काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सडतोड उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. कामगाराची सभा ही काही शिवसेनेची सभा नव्हती. गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी त्यांनी काय भूमिका काय घेतली होती ? आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांची कोणी भेट घेतली होती ? उद्धव ठाकरे आता सेनेत आले आहे. कमरेखालची भाषा बोलणे ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ती बाळासाहेबांना शोभत होती पण ती सगळ्यांना शोभेल असं नाही असं प्रतिउत्तर आव्हाड यांनी दिलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close