S M L
  • बिल्डरावर गोळीबार सीसीटीव्हीत कैद

    Published On: Feb 18, 2013 04:18 PM IST | Updated On: May 14, 2013 03:11 PM IST

    17 फेब्रुवारीनवी मुंबईत एस.के.ब्रदर्स बिल्डर्सचे मालक सुनीलकुमार लोहारीया यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात सुनीलकुमार यांचा मृत्यू झाला. वाशीतल्या सेक्टर 28 मधल्या लोहारिया यांच्या ऑफिसमध्ये 17 फेब्रुवारी रोजी सकाळी दोन व्यक्तींनी 4 राऊंड फायर केले. सिक्युरिटी गार्डच्या वेशात आलेल्या दोन हल्लेखोर लगेच पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यातल्या एकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. या आरोपीने आपला या हल्ल्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला. तर या हत्येमागे नवी मुंबईतल्या बिल्डर लॉबी असल्याचा आरोप लोहारीया यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासाबद्दलही लोहारीया कुटुंबियांनी संशय व्यक्त केलाय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close