S M L
  • गोपीनाथ मुंडेंचा केंद्रेकरांना पाठिंबा

    Published On: Feb 21, 2013 12:09 PM IST | Updated On: Feb 21, 2013 12:09 PM IST

    21 फेब्रुवारीराष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दबावामुळे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली करण्याचा घाट घातला जात आहे. पण कोणत्याही अधिकार्‍यावर राजकीय दबाव असता कामा नये. केंद्रेकर यांचीही पहिली नियुक्ती आहे. केंद्रेकर हे प्रामाणिक जिल्हाधिकारी आहे. त्यांनी पाण्याचे अवैध टँकर रोखले,अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई केली. मला खात्री आहे मुख्यमंत्री ही बदली रद्द करतील जर असे झाले नाहीतर मीही या आंदोलनात उतरेन. मी एक पक्षाचा नेता म्हणून नाही तर एक बीडकर म्हणून आंदोलनात उतरले असा इशारा बीडचे खासदार आणि लोकसभेतले विरोधी पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close