S M L

पीटरसनने इंग्लंडचा डाव सावरला

21 डिसेंबर मोहालीमोहाली टेस्टमध्ये कॅप्टन केविन पीटरसनची शानदार सेंच्युरी आणि फ्लिंटॉफने त्याला दिलेली साथ यामुळे इंग्लंडच्या टीमने भारताला चोख प्रत्युत्तर दिलंय. केवीन पिटरसनने 144 रन्स केले.त्यात 17 फोर आणि 1 सिक्सचा समावेश होता. टेस्ट करियरमधली त्याची ही 15 वी टेस्ट सेंच्युरी.पीटरसन मैदानावर आला तेव्हा इंग्लंडची स्थिती नाजूक होती केवळ एका रन्सवर त्यांच्या दोन विकेट गेल्या होत्या. कप्तानाला साजेशी संयमी खेळी करत त्याने इंग्लंडला सुस्थितीत आणून सोडलं. पीटरसनने प्रथम कूक आणि नंतर फ्लिंटॉफबरोबर शतकी भागिदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. फ्लिंटॉफनेही संयमी खेळ करत आपली 25वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे इंग्लंडने 250चा टप्पा ओलांडला. त्यापूर्वी मात्र पहिल्या सेशनमध्ये भारताने आपलं वर्चस्व गाजवलं होतं. भारताने सुरूवातीलाच इंग्लंडला 2 धक्के दिले होते. पीटरसनला पुन्हा हरभजनने आऊट केलं. 144 रन्सवर तो एलबीडब्लू झाला. त्यानंतर लगेचच फ्लिंटॉफ 62 रन्सवर आऊट झाल्यामुळे इंग्लंडची टीम पुन्हा अडचणीत आली आहे. दिवस अखेर इंग्लंडने 6 विकेटवर 282 रन्स केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2008 10:54 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2008 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close