S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • केंद्रेकरांच्या बदलीविरोधात बीडकरांचा एल्गार
  • केंद्रेकरांच्या बदलीविरोधात बीडकरांचा एल्गार

    Published On: Feb 21, 2013 11:36 AM IST | Updated On: Feb 21, 2013 11:36 AM IST

    21 फेब्रुवारीबीड चे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदली प्रकरणावरुन जिल्ह्यात संताप व्यक्त होतोय. केंद्रेकर यांच्या बदलीच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयाविरोधात आज सामाजिक संघटनांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली. मात्र या बंदला माजलगावमध्ये हिंसक वळण लागलं. इथे बायपास रोडवर दोन एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली. अज्ञात जमावानं ही तोडफोड केल्याचं कळतंय. पण शहरात मात्र या बंदला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या बंदमध्ये सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि व्यापारी संघटनाही सहभागी झाल्या आहेत. तर जोपर्यंत केंद्रेकर यांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत एकही शासकीय कार्यालय चालू देणार नसल्याचा इशारा मनसेनं दिला आहे. तर राजकीय दबावाखाली केंद्रेकरांची बदली करू नये अशी राजपत्रित अधिकारी महासंघानं मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close