S M L
  • 'राज ठाकरेंची पोरकट टीका'

    Published On: Feb 23, 2013 12:38 PM IST | Updated On: Feb 23, 2013 12:38 PM IST

    23 फेब्रुवारीराज्यात दुष्काळ महत्त्वाचा आहे. या लोकांना याबाबत काही घेणं देणं नाही. अशा पोरकट टीकांचं उत्तर देणं मी उचित समजत नाही. अशा पोरकट टीकांवर लक्ष द्याची गरज नाही. त्यांच्या टीकांना उत्तर देण्यापेक्षा लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहे अशा शब्दात केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे. तसंच भास्कर जाधवांनी माफी मागितल्यानं तो मुद्दाही आता संपल्याचंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारी राज ठाकरे यांची सोलापूरमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी गेली कित्येक वर्ष पाटबंधारे खाते तुमच्या पुतण्याच्या हातात आहे. ना कुठे धरणं उभी राहिली नाही, ना कुठे पाणी पुरवठा नाही. मग सिंचनावर खर्च केलेले 70 हजार कोटी गेले कुठे ? दुष्काळ हा काही भूकंप नाही, पूर नाही जो अचानक येतो. दुष्काळ चोर पावलाने येतो आणि दुष्काळाबाबत अगोदरच कळते. आताचा दुष्काळ हा 1972 पेक्षा भीषण आहे हे शरद पवार यांनी कबूल केलं आहे. मग दुष्काळ कसा पडला ? कुठे आहे नियोजन, का नियोजनात कमी पडले. सिंचनावर 70 हजार कोटी खर्च केले मग दुष्काळ पडला कसा ? असा थेट सवाल राज यांनी शरद पवारांना विचारला होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close