S M L
  • शालेय 'पोषण'आहाराला लागली 'किड'

    Published On: Feb 23, 2013 01:02 PM IST | Updated On: Feb 23, 2013 01:02 PM IST

    23 फेब्रुवारीराज्य सरकारनं नुकताच शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आठवडयातून एक दिवस ज्वारीची भाकरी आणि भाजी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण या भाकर्‍या बनवण्यासाठी बचत गटाच्या महिलांना किडे आणि खडे असलेली ज्वारी दिली जातेय.वारुळवाडीची प्राथमिक शाळा... सकाळी दहा ते दुपारी दोन...बचतगटाच्या महिला हा पूर्ण वेळ भाकर्‍या करताहेत. नारायणगावच्या शाळेची अवस्थाही तीच...आयबीएन लोकमत तिथे पोचल्यावर समोर आली सत्यपरिस्थिती.....किडलेली ज्वारी, त्यात खडे...बहुतेक ठिकाणी हे धान्य पोचलेलं नाही. जिथे पोचलंय तिथे आठवडाभर ज्वारी वाळवण्याचं, खडे काढण्याचं कामचं सुरु आहे. शाळा व्यवस्थापनानंही या योजनेला विरोध केला आहे. तर आदिवासी, कुपोषण असलेल्या ठिकाणी भाकरी योजना राबवा असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे सुविधांचा विचार न करताच ही योजना शिक्षकांच्या माथी मारली आहे असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close