S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • दुष्काळाच्या झळा :'आमचं आयुष्य रोडवरच होतं आजही रोडवर'
  • दुष्काळाच्या झळा :'आमचं आयुष्य रोडवरच होतं आजही रोडवर'

    Published On: Feb 23, 2013 01:24 PM IST | Updated On: Feb 23, 2013 01:24 PM IST

    विलास बडे, मुंबई 26 फेब्रुवारीराज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे आणि त्यातच मराठवाड्यातून मुंबई,पुण्यासारख्या शहरांमध्ये दुष्काळग्रस्तांचं स्थलांतर वाढत चाललंय. पण पाण्यासाठी गाव सोडलेल्या या लोकांचे हाल काही थांबले नाहीत.मुंबईच्या रस्त्यांवरचा कचरा उचलणारे हे हात आहेत 72 च्या दुष्काळात मराठवाड्यातून आलेल्या दुष्काळग्रस्तांचे... ऊन, वारा, पाऊस काहीही असो भल्या पहाटेपासूनच हे हात घाणीत राबत असतात. म्हणूनच शहरातली माणसं जगू शकतात. जी गावकी गावात करावी लागायची तीच त्यांना आज या शहरातही करावी लागत आहे. स्वयंसेवक म्हणून काम करणार्‍या या माणसांना अजून कामगाराचाही दर्जा मिळालेला नाही. विद्याविहारमधल्या रेल्वे रुळाशेजारी वसलेली ही लातूर आणि उस्मानाबाद जिल्हातल्या पारध्यांची वस्ती. 72 च्या दुष्काळात गावातल्या लोकांनी मारहाण करून यांना पळवून लावलं आणि ते या रुळाशेजारी येऊन रस्त्यावरचं आयुष्य जगू लागले. आमचं आज पर्यंतचं आयुष्य रोडवरच होतं आजही ते रोडवर आहे आणि ते असंच रोडवर निघून जाईल असं वाटतंय. अशी व्यथा महेश काळे यांनी मांडली.घाटकोपरच्या हायवेशेजारची असलेली ही पारधी वस्तीही मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांची. त्यांच्या डोक्यावरची सावली सरकारने कित्येकदा काढून टाकली. रस्त्यावरच्या भरधाव गाड्या त्यांच्या लेकरांना चिरडून गेल्या. पण ही माणसं इथून हलली नाहीत. त्यांच्याकडे 30 वर्षांच्या वास्तव्याचा दाखला होता. एवढंच नाही त्यांच्याकडे आधार कार्डही होतं, पण कोणाचा आधार मात्र नव्हता.ही माणसं मुंबई आल्यानंतर रस्ता, नाला, गटार डोंगर जिथं जागा मिळेल तिथं राहिली. पण आजही ती जिथं होती तिथंच आहेत. पाण्यासाठी गाव सोडलेली माणसं मुंबईच्या गटारात येऊन पडली. त्यांच्या दोन पिढ्या तिथंच चाचपत आहेत. एका दुष्काळाची भळभळती जखम घेऊन..

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close