S M L
  • परीक्षा हॉलमध्ये 'मुन्नाभाई स्टाईल'ने कॉपी

    Published On: Feb 23, 2013 02:30 PM IST | Updated On: Feb 23, 2013 02:30 PM IST

    23 फेब्रुवारीपरीक्षा आली की 'कॉपी'ला पाय फुटतात...पण कॉपी करण्यासाठी विद्यार्थी काय शक्कला लढवतील याचा काही नेम नाही. नंदूरबारमध्ये कॉपीचा नवा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यासाठी चक्क मोबाईलचाच वापर केला आहे.शहरातील डी आर हायस्कुलमध्ये विद्यार्थी मोबाईलवरून सर्रास कॉपी करत आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल नेण्यास मनाई असते. पण इथं हा नियम कागदावरच पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना मोबाईल फोन आणून देत आहे. आयबीएन-लोकमतनं हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर केंद्र संचालकांची बोबडीच वळली. विद्यार्थी वर्गात जाण्याअगोदर मोबाईल फोन न नेण्यास मनाई केली होती. त्यामुळे असा काही प्रकार घडलाच नाही असा अजब खुलासा केंद्र संचालक ई एस धिवरे यांनी केला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close