S M L
  • प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे

    Published On: Feb 25, 2013 10:17 AM IST | Updated On: Feb 25, 2013 10:17 AM IST

    25 फेब्रुवारीराज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस भीषणरूप धारण करत आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे कोरडे ठाक पडले आहे. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागतं आहे. अशा या दुष्काळाच्या परिस्थिती मुक्या जिवांसाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. जालना जिल्ह्यातील जंगलांमध्ये प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले. या पाणवठ्यांमुळे शेकडो प्राण्यांची होणारी भटकंती थांबणार आहे. जिल्ह्यात औद्योगिक परिसराजवळ वनविभागाची दिडशे हेक्टर जमीन आहे. या परिसरात हरण, काळवीट आणि इतर वन्यजीव आहेत. वनविभागाकडून या परिसरात जनावरांसाठी पाच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असुन त्यामध्ये रोज टँकरने पाणी ओतलं जातं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close