S M L
  • 'राज,तुम्हालाही तुमच्याच काकांमुळे किंमत'

    Published On: Feb 23, 2013 04:49 PM IST | Updated On: Feb 23, 2013 04:49 PM IST

    23 फेब्रुवारीमला माझ्या काकांमुळे किंमत आहे तुम्हाला तुमच्या काकांमुळे किंमत आहे. मी कुठे नाही म्हटलो तुमच्या काकांमुळे मला किंमत आहे, मला माझ्या काकांमुळेच किंमत आहे. तुमच्या काकांमुळे तुम्हाला तरी कोणी विचारलं असतं का ? असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना दिलं. तसंच टिंगल टवाळक्या करून जनतेची प्रश्न सुटणार आहे का ? शिवराळ भाषा बोलून गरीबाच्या घरा़तली चुल पेटणार आहे का ? व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून बोला असा खोचक टोलाही अजितदादांनी लगावला. काही काही जण पोपटपंची सारखे असतात. हे संध्याकाळी सभा घेतात कधी त्यांनी दुपारच्या भर उन्हात सभा घेतली आहे का ? आणि नुसती पोपटपंची सारखी बडबड करायची, नक्कला करायच्या पण एक विचारतो टिंगलटवाळी करून नक्कला करून कधी जनतेचे प्रश्न सुटतली का ? अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केली होती. अजित पवारांच्या या टीकेला राज यांनी सोलापुरात ठाकरी शैलीनं उत्तर दिलं होतं. मी सकाळी उठत नाही त्यामुळे दुपारी सभा घेत नाही. मग काय तुम्ही सकाळी मला चहा द्यायला येतात का ? तुम्हाला काय करायचे कोणी किती वाजताही उठो. उलट हेच पैसे मोजत बसता, कुठे लपवायचे याचा विचार करतात यांनाच झोपा लागत नाही. आम्हाला याची गरज नाही. मागे काय तर यांनी बंड केलं. कसला बंड पुकारताय. यांना वाटलं आमदार आपल्या पाठीशी आहे. त्याबळावर राजीनामा दिला. तीन दिवसानंतर शरद पवार मुंबईत आले. त्यांनी डोळे वटारून पाहताच सगळे आमदार मागे फिरले. हे एकटचे राहिले. मग काय कसा माफीनामा सादर केला हे आम्हाला चांगलेच माहित आहे. दोन महिने बिनखात्याचे मंत्री राहिले. आता घरच्यांच्या जीवावर जगण्याचं एक वय असतं. हे 52 वर्षांचे झाले अजूनही काकांच्या जीवावर जगतात. काकांनी हातवर केला तर साधा पानटपरीवालाही ओळखणार नाही अशी विखारी टीका राज ठाकरे यांनी केली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांनी राज यांचे टीकेकडे दुर्लक्ष करत राज यांची टीका पोरकट असून त्यावर उत्तर देणार नाही. त्याहीपेक्षा जनतेची प्रश्न महत्त्वाची आहे असं स्पष्ट केलं. एकंदरीच राष्ट्रवादी विरूद्ध मनसे या सामन्यात एकमेकांवर टीका-टिप्पण्यांमुळे राजकीय वातावरणाला फोडणी मिळाली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close