S M L
  • उद्धव ठाकरेंनी घेतली राजची बाजू

    Published On: Feb 27, 2013 10:56 AM IST | Updated On: Feb 27, 2013 10:56 AM IST

    27 फेब्रुवारीराष्ट्रवादीमध्ये जर हिंमत असेल आणि त्यांना हातात दगड घ्यावे. त्यांना जर एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावे मग बघा त्यांचे महाराष्ट्रात काय हाल होतात. पण सत्ता हातात घेऊन पोलीस खात्याला गाठीशी बांधून अरेरावी करू नये त्यांनी सत्ता सोडावी आणि हातात दगड घ्यावे असा इशारा राष्ट्रवादीला देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची बाजू घेतली आहे.मंगळवारी अहमदरनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहे. राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आहे. अलीकडे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे हात पुढे केला होता. पण राज यांनी टाळी देण्याऐवजी टोला लगावला होता. पण आज झालेल्या प्रकारावर उद्धव ठाकरे राज यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close