S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अखेर इंदापूर एसटी स्थानकावर महिला स्वच्छतागृह चकाचक
  • अखेर इंदापूर एसटी स्थानकावर महिला स्वच्छतागृह चकाचक

    Published On: Mar 5, 2013 02:12 PM IST | Updated On: Mar 5, 2013 02:12 PM IST

    05 मार्चइंदापूर एसटी स्थानकावरच्या महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या स्वच्छतागृहामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्याची दखल घेत इंदापूर एसटी स्थानकाच्या प्रशासनाने घेत या स्वच्छतागृहाची साफसफाई केली आहे. दरम्यान, खासदार सुप्रीया सुळे यांच्या मतदार संघात येणार्‍या या स्थानकावरच्या महिला स्वच्छतागृहाच्या प्रश्नाची दखल सुप्रीया सुळेंनी घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी इंदापूर स्थानकावर आंदोलन करत आगार प्रमुखांना घेराव घातला. त्यानंतर त्यांनी या स्वच्छतागृहाच्या साफसफाईची नियमित प्रमाणे तपासणी केली जाईल. तसंच हे स्वच्छ राहील आणि नियमीतपणे स्वच्छतागृहाच्या साफसफाईची तपासणी केली जाईलअसं आश्वासन दिलंय. इंदापुर स्थानकामध्ये हा प्रश्न सध्या सुटलेला असला तरी अजुनही इतर स्थानकांवर हा प्रश्न कायमच आहे. इंदापूर स्थानकासारखीच स्वच्छतागृहांची दुरावस्था ठिकठिकाणच्या स्वच्छतागृहांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे फक्त इंदापूरचा प्रश्न न सोडवता राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात असलेलं एसटी महामंडळ सगळ्याचं स्थानकांवर जाणवणारा महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडवणार का हा खरा प्रश्न आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close