S M L
  • शेतकरी देतोय करपलेल्या पिकांना 'खांदा'!

    Published On: Mar 5, 2013 02:47 PM IST | Updated On: Mar 5, 2013 02:47 PM IST

    अलका धुपकर, जालना05 मार्चमराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळामुळे हवालदिल झाले आहेत. हे संकट जितकं आसमानी आहे त्याहूनही अधिक ते सुलतानी आहे. एकीकडे पाणी नसल्यामुळे मोसंबीच्या बागा करपून गेल्या आहेत तर दुसरीकडे दुष्काळासाठी निधीची कमतरता नसल्याचा छातीठोक दावा करणार्‍या सरकारची कोणतीही मदत शेतकर्‍यांना मिळत नाही. ताराबाई गायकवाडला भेटायला आम्ही तिच्या मळ्यावर गेलो. अंबड तालुक्यातल्या सौदलगावमधली ती अत्यल्पभूधार शेतकरी आहे. मळ्यावर बांधलेल्या छोट्याशा घरात ताराबाई, तिचा नवरा, तिची बहीण आणि 90 वर्षांची आई, असे चौघं राहतात. यंदा तिची दीड एकरवरची मोसंबीची उभी बाग करपून गेली. शरद पवार ते दुसरे पवार आमच्या मदतीला कोन येतं? काय सहकार्य करतात? असा संतप्त सवाल ताराबाई गायकवाड यांनी उपस्थित केलाय.ताराबाईनं 13 हजार रुपये खर्चून शेतात अडीचशे फूट नवी बोअरवेल बांधली. पण, त्यालाही पाणी लागलं नाही. फक्त मोसंबीचीच बाग नाही तर कापूस आणि ज्वारीच्या पिकांनीही पाण्याअभावी मान टाकली आहे. अडीच हजार रुपयांच्या बियाणांच्या तीन बॅगा आणल्या. खत दोन हजार रुपयांचं, मेहनतही केली. पण कापूस आला फक्त अडीच हजार रुपयांचा. ज्वारीचं पण तेच झालं अशी व्यथा फारूख शेख यांनी मांडली.ताराबाईला स्वत:च्या वृद्ध आईवर उपचार करायला पैसे नाहीत. पण तिने पैसे देऊन जळालेल्या बागेचे फोटो काढले आणि तलाठ्याकडे दिले. पण पंचनामा झालाच नाही. मदत मिळेल या आशेवर मृतदेह दारात ठेवल्याप्रमाणे शेतकरी बाग न कापता रोज ती बघतआहेत.मराठवाडामध्ये डाळिंब, मोसंबी, सीताफळ आणि चिकूच्या बागा पाण्याअभावी करपून गेल्या आहेत. सरकार म्हणतं दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधीची कमतरता नाही. मग या बागांचे पंचनामे करून मदत कधी मिळणार.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close