S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • अँम्ब्युलन्समधून देतेय श्वेता बारावीची परीक्षा
  • अँम्ब्युलन्समधून देतेय श्वेता बारावीची परीक्षा

    Published On: Mar 6, 2013 03:36 PM IST | Updated On: Mar 6, 2013 03:36 PM IST

    06 मार्चजिद्द असेल तर कोणत्याही गोष्टीवर मात करता येते याचा धडाच मुंबईच्या श्वेता मंदोलिया या बारावीच्या विद्यार्थीनीनं घालून दिला आहे. सध्या बारावीची परिक्षा सुरू आहे.श्वेताही बारावीची परीक्षा देतेय. पण आज पेपरच्या आधी तिच्या पोटात दुखू लागल्यानं तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आणि तिचं ऍपंेडिक्सचं ऑपरेशन झालं. डॉक्टरनं तिला परीक्षा न देण्याचा सल्ला दिला. पण आपल्या मनाशी निश्चय केलेल्या श्वेताने ऍम्ब्युलन्समध्ये बसून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. विले पार्ले इथल्या मीठी बाई कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या श्वेताचं माँ माणिकबेन मोरारजी गर्ल्स कॉलेज हे परीक्षा केंद्र आहे. श्वेताची जिद्द बघून या शाळेनंही तिला ऍम्ब्युलन्समध्ये बसून परीक्षा देण्यासाठी विशेष व्यवस्था करून दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close