S M L
  • वाघिणी जेंव्हा गावचा 'पाहुणचार' घेते...

    Published On: Mar 7, 2013 11:40 AM IST | Updated On: Mar 7, 2013 11:40 AM IST

    07 मार्चचंद्रपूरमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधल्या आष्टा गावात पट्टेदार वाघिणीने दहा तासांचा मुक्काम ठोकल्यामुळे गावकर्‍यांची चांगलीच दात खिळी बसली होती. जंगलातून भटकलेली ही वाघिणी आष्टा या गावात शिरली. गावात आल्यानंतर एका गायीला फस्त करून ही वाघीण येथील रहिवासी दिलीप रामगुंडे यांच्या घरातल्या तणसावर मस्त झोप मारली. काही वेळानंतर वाघ तणसावर असल्याची बातमी वार्‍यासारख्या पसरली आणि तिला बघण्यासाठी गावकर्‍यांनी एकच गर्दी केली. गावकर्‍यांनी अगोदर तिला दगड मारून तिला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मोर्चा सांभाळला. वनविभागाच्या पथक ाने साडेसहा तास प्रयत्न करून ट्रँक्विलायझरच्या मदतीने वाघिणीला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केलं. आणि अखेर वाघिणीला परत जंगलात सोडण्यात आलं. वाघिणीने जंगलात गेल्यानंतर गावकर्‍यांचा जीव भांड्यात पडला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close